विचारवंत
हर्बर्ट स्पेन्सर
१) हर्बर्ट स्पेन्सरचा जन्म डर्बी शहरामध्ये खालील पैकी कोणत्या साली झाला ?
अ)
२७ एप्रील १८२०
ब) 2० मार्च १८22
क) १० जानेवारी १८५०
ड) २० मार्च १८२५
2) "नॉन कन्फर्मिस्ट" या वर्तमानपत्रातून 'वाचकांचा पत्रव्यवहार' या सदरात कोणत्या विचारवंताने आनेक पत्र लिहीली ?
अ) ऑगस्ट कॉम्ट)
ब)
हर्बर्ट स्पेन्सर
क) कार्ल मार्क्स
ड) डरखाईम
३) १८४८ मध्ये हर्बर्ट स्पेन्सर लंडनमधील कोणत्या वर्तमानपत्रात उपसंपादक म्हणून काम पाहत होता ?
अ) नॉनकन्फर्मिस्ट
ब)
इकॉनॉमिस्ट
क) वरील दोन्ही
ड) यापैकी नाही
४) हर्बर्ट स्पेन्सरचे "सोशल स्टॅटिकस" (Social Statics) हे पहिले पुस्तक व कोणत्या साली प्रकाशित झाले ?
अ)
१८५१
ब) १८५५
क) १८६०
ड) १८७०
५) हर्बर्ट स्पेन्सरने कोणत्या पुस्तकामधून राज्य व सरकार यांच्या कर्तव्य अधिकार क्षेत्रा बाबतच्या कल्पना विस्तारपूर्वक मांडलेल्या आहेत ?
अ)
सोशल स्टॅटिकस
ब) प्रिन्सीपल्स ऑफ सायकॉलॉजी
क) फर्स्ट प्रिन्सीपल्स
ड) प्रिन्सीपल्स ऑफ सेशिओलॉजी
६) योग्य जोडी ओळखा -
अ) (I) सोशल स्टॅटिकस -१८५४
ब) (II) प्रिन्सिपल्स ऑफ सायकॉलॉजी -
१८१०
क)
(III) फस्ट प्रिन्सिपल्स -1862
ड) (IV) दी स्टडी ऑफ सोशियालॉजी -१८०९
७) खालील पैकी कोणता ग्रंथ हर्बर्ट स्पेन्सरने लिहीला नाही?
अ) मॅन व्हर्सेस दी स्टेट
ब) डिस्क्रीव्टीव्ह सोशियालॉजी
(Descriptive Sociology)
क) प्रिन्सीपल्स ऑफ बायोलॉजी (Principles of bilogy)
ड)
पॉझिटीव्ह फिलॉसॉफी
८) खालील पैकी कोणाची कांही पुस्तके ब्रिटनमधील फोर्टनाइटली रिव्हयू या पक्षिकातून व अमेरिकेतील पॉप्युलर सायन्स मंथली या मासिकातून प्रसिध्द झाली ?
अ)
हर्बर्ट स्पेन्सर
ब) ऑगस्ट कॉम्ट
क) डार्विन
ड) यापैकी नाही
९) "ओरिजिन ऑफ स्पेसीस" (Origin of Species) हा ग्रंथ कोणी लिहीला?
अ) हर्बर्ट स्पेन्सर
ब) ऑगस्ट कॉम्ट
क) डार्विन
ड) कार्ल मार्क्स
१०)
"Principles of Geology" हा ग्रंथ कोणी लिहीला ?
अ)
लाएल
ब) मॅक्स वेबर
क) कार्ल मार्क्स
ड) कोहेन
११) हर्बर्ट स्पेन्सरला उत्क्रांतीची कल्पना खालील पैकी कोणत्या ग्रंथामधून सूचली ?
अ) ओरिजीन ऑफ स्पेसीज
ब)
प्रिन्सीपल ऑफ जिओलॉजी (Principle of Geology)
क) वरील दोन्ही
ड) यापैकी नाही
१2) "सामाजिक ऐक्य" ही संकल्पना हर्बर्ट स्पेन्सरने कोणापासून घेतली ?
अ)
ऑगस्ट कॉम्ट
ब) डार्विन
क) माल्थसड
ड) अॅडम स्मीथ
१३) पदार्थ नेहमी अनिश्चित, असंबध्द, अभिन्नत्वाकडून निश्चित संबध्द भिन्नत्वाकडे संक्रमित होत आसतो त्यास स्पेन्सर काय म्हणतो ?
अ) सेंद्रिय पैक्य
ब) सैनिकी समाज
क)
उत्क्रांती
ड) क्रांती
१४) स्पेन्सरच्या विवेचनाप्रमाणे खालील पैकी कोणत्या घटकांच्या परस्पर संबंधातून सर्व विश्वाची जडन-घडन झाली ?
अ)
पदार्थ,
शक्ती व गति
ब) व्यक्ती-कुटुंब व समाज
क) व्यक्ती, जात व धर्म
ड) यापैकी नाही
१५) योग्य विधान ओळखा -
अ) स्पेन्सरच्या मते शक्ती व पदार्थ गतिमान असतात
ब) स्पेन्सरच्या मते पदार्थ व शक्ती अविनाशी आहे
क) स्पेन्सरच्या मते पदार्थाचे स्वरुप बदलेल परंतू पदार्थाच्या अविनाशीत्वाच्या तत्वाला बाधा पोचत आहे
ड)
वरील सर्व
१६) डार्विनचा उत्क्रांतीवादी सिध्दांत हा खालील पैकी कोणत्या बाबीशी निगडीत होता ?
अ)
वनस्पती व प्राणि (जीव श्रृष्टी)
ब) सेंद्रिय व असेंद्रिय
क) वनस्पती व समाज
ड) यापैकी नाही
१७ ) डार्विनच्या विवेचनाप्रमाणे या सृष्टी वरील अनेक वनस्पती व प्राणी नष्ट झारि कारण
अ)
वनस्पती व प्राणी यांना वातावरण व परस्पराशी सतत संघर्ष करावा लागला
ब) वनस्पती व प्राण्यांचे आयुष्य तवेढच होते
क) वनस्पती व प्राणी आपोआप काळाच्या उदरात नष्ट झाली
ड) वरील सर्व
१८) खालील पैकी कोणता ग्रंथ ऑगस्ट कॉम्टने लिहीला नाही ?
अ) पॉझीटीव्ह फिलॉसाफी
ब) सिस्टीम ऑफ पॉझिटीव्ह लॉजिक
क) पॉझीटीव्ह क्लॅन्डर
ड)
कास्ट अॅन्ड रेस इन इंडिया
१९) इतिहास ही अभिजनशाहीची स्मशानभूमी होय" हे विधान कोणाचे ?
अ) मोस्का
ब) सी डब्लू मिल्स
क) कार्ल मार्क्स
ड)
पॅरेतो
20) खालील पैकी कोण प्रकार्यवादी समाजशास्त्रज्ञ आहेत ?
अ) डरखाईम
ब) हर्बर्ट स्पेन्सर
क)
वरील दोन्ही
ड) यापैकी नाही
2१) हर्बर्ट स्पेन्सरच्या मते पुढील पैकी कशाला सामाजिक उत्क्रांती म्हणता येईल ?
अ) विशिष्ट काळातील वाढती सामाजिक गुंतागुंत
ब)
साध्यासमाजापासून जटील समाजापर्यतची वाटचाल
क) सामाजिक प्रगती
ड) वरील सर्व
22) समाजशास्त्रीय विचारधारेत पुढील पैकी कोणता दृष्टिकोण हा अद्य विचार मानता येईल ?
अ) प्रतिकात्मक आंतरक्रीयावादी
ब)
उत्क्रांती वादी
क) संरचना कार्यवादी
ड) संघर्षवादी
2३) स्पेन्सरच्या दृष्टिकोणानूसार सैनिकी' प्रकारच्या समाजात -
अ) व्यक्तीला नगण्य महत्व असते
ब) सैन्यदलाला महत्व असते
क) राजकीय नियंत्रणाचे केंद्रिकरण झालेले असते
वरील सर्व
2४) हर्बर्ट स्पेन्सरच्या मते औद्योगीक समाजात
अ)
संबंध समोपचाराचे असतात
ब) संबंध संघर्षाचे असतात
क) संबंधच असत नाही
ड) यापैकी नाही
2५) हर्बर्ट स्पेन्सरच्या मते कोणत्या समाज प्रकारात राज्याची रचना विकेंद्रित असते ?
अ)
औद्योगिक समाज
ब) साधा समाज
क) समिश्र समाज
ड) सैनिकी सम्राज
2६) हर्बर्ट स्पेन्सरने साध्या समाजाच्या खालील पैकी कोणत्या अवस्था सांगितल्या ?
अ) कोणीही प्रमुख नाही असा समाज
ब) नाममात्र प्रमुख असणारा समाज
क) प्रमुखाचे स्थान अस्थिर असणारा समाज व प्रमुखाचे स्थान स्थिर असणारा समाज
ड)
वरील सर्व
2७) हर्बर्ट स्पेन्सरने समिश्र समाजाचे खालील पैकी कोणते दोन उपप्रकार सांगितले ?
अ)
द्विवार समिश्र व त्रिवार समिश्र समाज
ब) गुंतागुंतीचा व साधा समाज
क) वरील दोन्ही
ड) यापैकी नाही
2८) स्पेन्सरने त्या-त्या समाजातील लोकांच्या वस्ती करुन राहण्याच्या क्रियेवरुन खालील पैकी कोणते समाज प्रकार पाडले ?
अ) भटके समाज
ब) अर्धवस्ती केलेले समाज
क) वस्ती केले समाज
ड)
वरील सर्व
2९) स्पेन्सरच्या विवेचनाप्रमाणे शांततावादी संबंधातून कोणती नियम व्यवस्था अस्तित्वात येते ?
अ)
दुर्बल आणि विकेंद्रित
ब) जुलमी व केंद्रवर्ती
क) वरील दोन्ही
ड) यापैकी नाही
३०) स्पेन्सरच्या मते समाजातंर्गत रचना ही कशावर आवलंबून असते ?
अ) उत्क्रांतीवादाच्या
ब)
शेजारी समाजाशी असलेल्या संबंधावर
क) वरील दोन्ही
ड) यापैकी नाही

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा